शिरूर, (रिपोर्टर)ः-शेतातील रानडूकरे पकडण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीसह तिच्या भावासोबत अभ्रद्र वर्तन करत मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरचे प्रकरण मध्यस्थी करून मिटविण्यात आले. परंतू त्यानंतरही आरोपी आम्हाला त्रास देत आहे, धमक्या देत आहे, जातीवाचक शिवीगाळ करत आहे अशा आशयाची तक्रार 40 वर्षीय महिलेने शिरूर पोलिसात दिल्यानंतर चौघांविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण आणि विनयभंगाचा प्रकार हा 21 फेब्रुवारी रोजी घडला. मात्र या प्रकरणात वनवे आणि खोक्या म्हणुन कुप्रसिध्द असलेला सतिष भोसले याने सदरचे प्रकरण मिटविले होते असे फिर्यादीत म्हंटले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भोसले कुुटूंब गेल्या काही वर्षापासून शिरूर तालुक्यातील झापेवाडी या ठिकाणी राहते. या कुटूंबातील मुलाची इयत्ता 10 वीची परिक्षा असल्याने ते सध्या शिरूर परिसरात राहत आहेत. 21 फेब्रुवारी रोजी शिरूर तालुक्यातील बावी येथील दिलीप रामराव ढाकणे, महेश दिलीप ढाकणे, संदिप मिटू ढाकणे, राम उत्तम ढाकणे हे चौघे संबंधित पिडीत कुटूंबियांच्या घरी आहे. आमच्या शेतात रानडुकरे मोठ्या प्रमाणावर उच्चांद घालत आहेत. त्यांंना हुसकावून द्या किंवा पकडला असे या चौघांनी कुटूंबातील महिलेला म्हंटले. मात्र त्या महिलेने माझे पती अपंग आहेत, आम्ही ते काम आता करत नाहीत असे म्हंटले असता तुमच्या मुलीला आणि मुलाला आमच्या शेतात डुकरे पकडण्यासाठी फास लावायला सांगा असे म्हंटल्यानंतर माझी मुलगी आणि मुलगा हे त्यांच्या शेतात गेले त्यावेळी त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मुलाला मारहाण केली. जिवे मारण्याच्या हेतूने तलवारीने वार केले तर मुलीसोबत अभद्र वर्तन केले. हा प्रकार 18 फेब्रुवारी रोजी घडला. याची तक्रार 21 फेब्रुवारी रोजी पोलिसात केली. मात्र वनवे व सतिष भोसले यांनी मध्यस्थी करून ते प्रकरण मिटविले, परंतु पुन्हा ढाकणे कुटूंबियांनी मारहाण आणि धमक्या देण्यास सुरूवात केल्या आहेत असे सांगून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने दिलीप ढाकणे, महेश ढाकणे, संदिप ढाकणे,रामा ढाकणे यांच्या विरोधात गुन्हा रजि.नं.63/2025 कलम 3 (1),(आर),3(1) (एस). 3(1) (डबल्यू),3 (1) (डबल्यू) (आय आय), 4 (1) अनुसुचित जाती अनुसुचित जमाती कलम 109, 74, 352, 351 (2), 351 (3), 3 (5), बीएनएस प्रमाणे कलम 8 बाललैगिंग अपराध पासून संरक्षण प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हनपुडे करत आहेत.