परळी वैजनाथ(प्रतिनिधी)
परळी शहरातील नागरिकांकडून नळपट्टी सक्तीने वसुल करणार्या परळी नगरपालिकेकडे पाटबंधारे विभागाची 3 कोटी 41 लाख 79 हजार 824 रुपये इतकी थकबाकी असुन पाटबंधारे विभागाने ही थकबाकी भरण्याची मुदत संपली तरी नगरपालिकेने ही थकबाकी भरलेली नसल्याने पाणीपुरवठा कधीही बंद होवु शकतो.नगरपालिकेमुळे परळीकरांवर पाणीसंकट येण्याची भिती निर्माण झाली आहे.
परळी शहराला नागापूर येथील वाण प्रकल्पातुन पाणी पुरवठा केला जातो.परळी शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर परळी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वाण प्रकल्पातील पाणीसाठ्यापैकी 9 टक्के पाणी राखीव ठेवले जाते.या पाण्याची दरवर्षी 40 लाख 33 हजार रुपये इतकी पाणीपट्टी माजलगाव पाटबंधारे विभागाकडे भरावी लागते.परळी शहरातील नागरिकांकडून सक्तीने नळपट्टी वसुल केल्यानंतरही पालिका पाटबंधारे विभागाचे पैसे भरत नसल्याने माजलगाव पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी दि.21 मार्च रोजी न.प.मुख्याधिकार्यांना नोटीस पाठवून चालू वर्षाची 40 लाख 33 हजार रुपये व मागील थकबाकी असे एकुण 3 कोटी 41 लाख 80 हजार रुपये दि.25 मार्चपर्यंत भरावेत अन्यथा दि.26 मार्च रोजी नागापूर येथील वाण धरणातुन होणारा पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे कळवले होते.दि.26 मार्चपर्यंत नगरपालिकेने सदरील पैसे भरलेले नसल्याने पाटबंधारे विभाग कधीही परळी शहराचा पाणी पुरवठा तोडु शकते. सध्या वाण धरणात 72 टक्के पाणीसाठा उपलब्ध असला तरी नगरपालिकेने पाणीपट्टी भरली नाही तल भर उन्हाळ्यात परळीकरांना पाणीटंचाईस सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
दोन दिवसांत पैसे भरु
आमच्याकडे पाटबंधारे विभागाची मोठी थकबाकी असली तरी पुर्ण थकबाकी भरणार नाहीत.या थकबाकीतील काही रक्कम येत्या दोन दिवसांत भरण्यात येईल.नागरीकांना होणार्या पाणीपुरवठ्यात कुठलाही अडथळा येऊ देणार नाही.
– त्र्यंबक कांबळे
मुख्याधिकारी न.प.परळी
आंधळ्या कारभाराचा फटका
धरणात पाणी अ महेशसूनही पाच-सहा दिवसाआड पाणीपुरवठा करणार्या नगरपरिषदेच्या आंधळ्या कारभाराचा फटका परळीकरांना बसत आहे.नागरिकांकडून कर वसूल करून त्याचे काय केले जाते याची सखोल चौकशी झाली पाहिजे.नागरिकांना पाणीपट्टी भरण्यासाठी बेजार करणार्या नगरपरिषदेने स्वतःच कर न भरल्यामुळे नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरावे लागेल.
– अश्विन मोगरकर
नागरीक, परळी