आधी मुस्लिमांच्या नावाने शिमगा, नंतर पुरणपोळी
मुंबई (रिपोर्टर) अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं? अधिवेशनाने देशाला, राज्याला चांगलं गाणं दिलं. हे समाधान मानावं लागेल. कबरीपासून कामरापर्यंत असं अधिवेशन आहे. हे जयंत पाटील म्हणाले ते बरोबर आहे. सत्ताधार्यांचा माज दिसला. या पूर्वी कधीही गेल्या काही वर्षात विरोधी पक्षाने राज्यपलांकडे जाऊन सत्ताधारी आपल्या पाशवी मताचा वापर कसा करतात आणि त्याचा वापर कसा करतात हे सांगितलं. असं कधी घडलं नव्हतं असं उद्धव ठाकरे म्हणाले. गेल्या अनेक वर्षात सभापतीवर पहिल्याच अधिवेशनात अविश्वास ठराव आणावा लागला. असं कधीच झालं नव्हतं. अधिवेशन काळात बोलू दिल्या असतं आणि उत्तरं दिली असती तर मला जनतेसमोर बोलण्याची वेळ आली नसती असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे ठाकरेंनी पाश्वी बहुमत मिळालेल्या अस्वस्थ सरकारने निरर्थक अर्थसंकल्प सादर केल्याचे सांगत या सरकारची अवस्था ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी असल्याचे सांगितले. एकीकडे ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा द्यायचा आणि निवडणुका आल्या की, ‘सौगात-ए-मोदी’ चा नारा दिला जातो. वर्षभर मुसलमानांच्या नावाने शिमगा करायचा आणि ईद जवळ आली की, मुस्लिमांना पुरणपोळी द्यायची, हे भाजपाचं ढोंग आहे.
खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा घोषणा केल्या. वारेमाप घोषणा केल्या. जनतेला फसवा, जनता भोळीभाबडी आहे. मग सत्तेत यायचं आणि जनतेना चिरडून टाकलं. ही दडपशाही आहे. ही दडपशाही ब्रिटीशांना जमली नाही ती यांना काय जमणार? असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुस्लिमांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले होते. मुस्लिमांनी मते दिले तर सत्ता जिहाद म्हणायचे. आता ईद निमित्त सौगात हे मोदी हा कार्यक्रम भाजपने घेतला आहे. 32 लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन 32 लाख भाजपचे कार्यकर्ते भेट देणार आहे. हा सौगात ए मोदी नाही. हा निर्लज्जपणा आहे. सौगात ए सत्ता आहे. हे बोगस हिंदुत्ववादी आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
‘हिंदुंच्या मंगळसूत्राचं आता रक्षण कोण करणार?’
मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आली तर पुरणपोळी द्यायची. आता जे उडाण टप्पू आहेत ते कसे टोपी घालून कसे जातात ते पाहा. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आऱोप करण्यापूर्वी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढला. हिंदुंच्या मंगळसूत्राचं आता रक्षण कोण करणार? आता आहे का हिंदुत्ववादी पक्ष? असं उद्धव ठाकरे म्हणाले. सौगात ए सत्ता ही बिहार, यूपी निवडणुकीपर्यंतच राहणार की अजूनही राहणार आहे. भाजपने एकदा हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.