बीड, (रिपोर्टर)ः- बीड येथील जेष्ठ विधीतज्ञ तथा बीड जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.अविनाश गंडले आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड.मनिषा गंडले यांची सुकन्या अॅड.सानिया गंडले हिची निवड प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी या पदी झाली आहे. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 23-24 या वर्षात घेतलेल्या न्याधीश परिक्षेच्या निकालामध्ये राज्यातून 6 वा क्रमांक पटकावत हे आपले घवघवीत यश संपादित केलेले आहे. लोकसेवा आयोगाने काल सायंकाळच्या दरम्यान न्यायधिश परिक्षेचा निकाल घोषीत केला आहे.
दोन वर्षापुर्वीच अॅड.सानिया गंडले यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली होती. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमार्फत परिक्षेचा अभ्यास करण्या सुरूवात केली. पहिल्याच प्रयत्नात अॅड.सानिया गंडले यांनी हे यश संपादित केले आहे. गेल्या 15 दिवसापुर्वी लोकसेवा आयोगाने या परिक्षेच्या मुलाखती घेतल्या होत्या. सन 2024-2025 या वर्षीच्याही न्याय दंडाधिकार्या लेखी परिक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. मात्र 2023-2024 परिक्षेच्या लेखी परिक्षा आणि मुलाखतींचा निकाल काल सायंकाळी 5.30 ला घोषीत केल्यानंतर त्यांची निवड झाल्याचे घोषीत झाले आहे. अॅड.सानिया यांच्या या घवघवीत यशाबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यामध्ये सहाय्यक सरकारी वकिल अॅड.अजय तांदळे, सहाय्यक सरकारी वकिल अॅड.प्रविण राख, अॅड.पायाळ, अॅड.आदित्य राख, किरण काळे आदींनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.