बीड, (रिपोर्टर)ः- उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक शेतकरी बांध पेटवतात. मादळमोही येथील एका शेतकर्याने बांध पेटविल्याने त्याचा वनवा शेजारच्या शेतात गेला. शेजार्याच्या शेतातील दिड एक्कर ठिबक, आंबा, डाळीं, ांबूची झाडे जळाली आहेत. जा विचारण्यासाठी गेलेल्या शेतकर्यास आरोपीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे घडली.

रोहिदास वरपे याने आपल्या ांधावरील गवत पेटविल्याने त्याचा वनवा बाजूचे शेतकरी द्रोपदीबाई शिवाजी वरपे यांच्या शेतामध्ये गेला. त्यांच्या शेतामधील दिड एक्कर ठिबक, 5 आंब्याची झाडे, डाळीं
ांबूची झाडे जळाली आहेत. सदरील घटनेत शेतकर्याचे मोठे नुकसान झाले. या बाबत द्रोपदी शिवाजी वरपे या संबंधितास जा विचारण्यासाठी गेल्या असता त्यांच्या तोंडावर चापटीने मारून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी द्रोपदी वरपे यांच्या फिर्यादीवरून रोहिदास वरपे व किशोर वरपे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.