वडवणी येथील भीम जन्मोत्सवाला भेट.
युवा नेते जयसिंग सोंळके व धनंजय देशमुख यांची उपस्थिती.

वडवणी (रिपोर्टर):- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचाराचे साक्षीदार होऊन सामाजिक परिवर्तन आजच्या तरुण बांधवांनी करावे तसेच व्यसनापासून दूर रहावे आणि यातूनच डॉ. आंबेडकरांची जयंती सार्थकी झाली असे म्हणता येईल असे विचार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मांडले. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वडवणी येथील सार्वजनिक जयंती उत्सवाच्या भीम जन्मोत्सव कार्यक्रमाला भेट दिली. आज सकाळी ९ वा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौका पासून ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत भव्य -दिव्य अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या जयघोषाने वडवणीकरांचे लक्ष वेधून घेतले. तर ठीक सकाळी १० वा. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य चौकात कार्यक्रम संपन्न झाला. याठिकाणी निळा ध्वजाचे ध्वजारोहण माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते जयसिंग सोळंके यांच्या उपस्थितीत पार पाडले. या कार्यक्रमाला वडवणीचे तहसीलदार संजय जिरांगे, वडवणी पोलीस स्टेशनचे प्रमुख एपीआय अमन सिरसट, नगराध्यक्ष शेषेराव जगताप यांच्यासह शेकडो समाज बांधवांसह इतर जण उपस्थित होते. यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून डॉ. आंबेडकर चौक या ठिकाणीच स्नेह सुरसी महाभोजनाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. तर आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मराठा युध्दे मनोज जरांगे पाटील यांनी भीम जन्मोत्सव कार्यक्रमाला भेट दिली.
जरांगे पाटील यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकाला प्रथम अभिवादन केले. यानंतर समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देताना ते पुढे म्हणाले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हा-आम्हाला विचार दिला आहे. त्या विचाराचे साक्षीदार होत सर्व समाज बांधवांनी गुण्यागोविंदाने राहात सामाजिक परिवर्तन देखील करावे. प्रत्येक समाजातील तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे. तेव्हाच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्थकी लागली असे म्हणता येईल. असे विचार मांडले. यावेळी मनोज जरांगे पाटील येणार आहेत. म्हणून वडवणीच्या मुख्य रस्त्यावर हजारोंच्या संख्येने सर्व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे आभार जयंती उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष राहुल गाडगे यांनी मानले आहे.








