परळी (रिपोर्टर): परळी वैजनाथ शहरातील वाहनांमधील बॅटर्या चोरणार्या टोळीला जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे. मोठ्या ट्रक मधील बॅटर्या काढून चोरून घेऊन जाणार्या दोन आरोपींना शहर पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून तीन ट्रक मधील 63 हजार रुपये किंमतीच्या सहा बॅटर्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.बॅटर्या चोरीचे प्रकार समोर येत होते. या संदर्भाने तीन ट्रक मालकांनी अंबाजोगाई रस्त्यावर लावलेल्या ट्रक मधील बॅटर्या काढून चोरीस गेल्या बाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या अनुषंगाने तातडीने तपास करत बॅटर्या चोरणार्या टोळीचा शोध पोलिसांनी घेतला.

या तपासात शहर पोलिसांनी रेहान शेख मुस्तफा व अन्वर खान जलाल खान पठाण (दोघेही रा. गौतमनगर, परळी वैजनाथ) या दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, या आरोपींच्या माध्यमातून बॅटरी चोरट्यांपर्यंत पोहचून चोरीच्या इतर घटनाही उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.








