केज (रिपोर्टर): सारूकवाडी (ता. केज) शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी बोअरचे 40 लोखंडी पाईप व 550 फूट वायर असा 32 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली.

सारूकवाडी येथील धीरज बाबासाहेब वनवे यांची शिवारातील फड नावाच्या शेतात जमीन आहे. या शेतात ठेवलेले 28 हजार रुपये किंमतीचे बोअरचे 40 लोखंडी पाईप व 4 हजार रुपये किंमतीचे 550 फूट बोअरचे वायर असा 32 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 13 एप्रिल रोजी उघडकीस आली. धीरज वनवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार बाबासाहेब बांगर हे करीत आहेत.