कर्जबाजारी, नापीकी, सावकारकीमुळे आत्महत्या वाढल्या
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागला. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्याच्या कार्यकाळात 71 शेतकर्यांनी आत्महत्या करून आपले जिवन संपविले. या आत्महत्या कर्जबाजारी, नापिकी आणि सावकारकीच्या जाचामुळे झाल्या असल्याचे समोर आले आहे. आत्महत्या ग्रस्त कुटूंबांना शासन काही मदत करतं, मात्र शेतकर्यांनी आत्महत्या करूच नयेत अशी उपाय योजना शासन का करत नाही.?
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याची संख्या जास्त आहे. दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. मराठवाडा आवर्षन ग्रस्त म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात सिंचना क्षेत्र कमी आहे. रोजगारासाठी उपाय योजना आखल्या जात नाहीत. बीड जिल्ह्यात उसतोड मजुरांचा आकडा जास्त आहे एकूणच मराठवाड्याची परिस्थिती बिकट असल्याने इथल्या शेतकर्यांना शेती परवडत नाही. शेतीतील खर्च आणि शेतीमालाला मिळणारा भाव याचं अर्थ गणीत लागत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जमध्ये बुडत आहे. कर्जातून नैराश्येत जात शेतकरी आत्महत्या करू लागला. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातील 71 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या रोकण्यासाठी शासनाकडून कोणत्याही उपाय योजना आखल्या जात नाही. शेतीमालाला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.