शेती औजारासह, ठिबक, स्प्रिंकलर जळून खाक.
लिंबागणेश,(रिपोर्टर)ः-बीड तालुक्यातील वाघिरा येथील रहिवासी बापुराव नरहरी आजबे यांचे लिंबागणेश येथील काळवाडी शिवारात गट नंबर 280 मध्ये शेतीजमिन असुन काल शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत त्यांचा गोठा आणि गोठ्यातील शेतीमाल कांदा, 2 एक्करमधील गोळा केलेले ठिबक तसेच 1 एक्कर मधील स्प्रिंकलर, शेतीकामासाठी आवश्यक आवजारे आणि सागवानाची झाडे यांचे एकुण जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असुन गोठ्याच्या जवळुन जाणार्या विद्युत तारेच्या शार्टसर्कीटमुळे आग लागल्याचे शेतकरी बापुराव नरहरी आजबे यांनी म्हटले आहे.
आज दि.19 रोजी सकाळी त्यांचा मुलगा शेतावर घरी पाणी नेण्यासाठी आला असता गोठा आगीत भस्मसात झाल्याचे कळाले. सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी संबंधित प्रकरणात फोटो आणि व्हिडिओ तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना पाठवुन आगीची कल्पना देत शेतकर्याशी फोनवरून बोलणे करून दिले. संबंधित प्रकरणात पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी यांना सुचना देतो असे तहसीलदार शेळके म्हणाले.