4 मे रोजी होणार मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण
बीड (रिपोर्टर): शहरात मागील 17 वर्षापासून संविधान दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात भरीव काम करणार्या गुणवंत व्यक्तींना पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मपाणि राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाते. या वर्षीच्या या पुरस्कारासाठी बीड जिल्ह्यासह राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणार्या गुणवंत कर्तुत्ववान व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठांच्या वतीने दिल्या जाणार्या विविध पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातील गुणवंत कर्तुत्ववान व्यक्तीची निवड करण्यात आली असून 04 मे रोजी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराचा वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप तरकसे यांनी दिली. यावर्षीचा आदर्श पत्रकार पुरस्कार सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांना जाहीर झाला आहे. यासह अन्य चार पत्रकारांचा यामध्ये समावेश आहे.
यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये दै.लोकाशाचे निवासी उपसंपादक उत्तम हजारे, दै. रिपोर्टर बीडचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, दै. पुढारी न्यूजचे बीड जिल्हा प्रतिनिधी उदय नागरगोजे, दै. लोकनायकच्या सह संपादिका नायरा राज मुळे, दैनिक दिव्य मराठीचे ब्यूरोचिप अमोल मुळे, साप्ताहिक आदर्श पोलखेलचे संपादक नितेश उपाध्ये यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्या समाजसेविक पुरस्कार मुंबई येथील समाजसेवक शाहिरा जाधव, बीड शहरातील ज्येष्ठ समाजसेविका सौ. सीमा ओस्तवाल मॅडम, जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्राचे राजू वंजारे, अभिजित वैद्य, जालना जिल्ह्यातील माधवराव नरसिंहराव पात्रे यांना उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्या अभिनेत्री आम्रपाली (स्नेहा) साबळे यांना उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कारासाठी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपशिक्षणाधिकारी अधिकारी मैना बोराडे मॅडम, वडवणीचे गटशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगरे, एअरपोर्ट संभाजीनगरचे पंकज आढाव यांची निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट अधिकारी म्हणून बीड जिल्हा परिषद बीड बांधकाम विभागाचे राजेंद्र ओव्हाळ यांच्यासह यांची निवड करण्यात आली. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करणार्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राचार्य सुधीर देशमुख (मराठवाडा कॉलेज ऑफ आयटी बीड), भागवत सावंत (उपळी हायस्कूल, उपळी), तालुका वडवणी, अनिता काळे (संस्कार विद्यालय बीड), रामराव विठ्ठल मोरे मोरे (जी. प .शाळा दुकडेगाव केंद्र चिंचाळा तालुका वडवणी), प्रा शशिकांत जावळे (कनिष्ठ महाविद्यालय,शिरूर कासार), वर्षा हिंगेसे (किड्स फॅशन प्री प्रायमरी स्कूल कालिका नगर बीड), देविदास हिरे (नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ता. चांदवड नाशिक), कल्याण घोडके (राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय बीड), शेख राजू शेख नूर (जि.प.प्रा. शाळा बहीरवाडी ता.जी.बीड), रामचंद्र कसबे मुख्याध्यापक (द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय बीड), राहुल निकाळजे (भैरवनाथ विद्यालय, अमळनेर ता.पाटोदा जिल्हा बीड), आदर्श शाळा पुरस्कार जि.प.उच्च माध्यमिक शाळा जरेवाडी ता. पाटोदा जिल्हा बीड मुख्याध्यापक आजिनाथ गहिनीनाथ सुळे, तर उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार गौतम गायकवाड उपप्राचार्य खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई ता. अंबाजोगाई यांना जाहीर करण्यात आला आहे. पद्मापाणी राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार अमोल जगताप (आवरगाव ग्रामपंचायत कार्यालय आवरगाव तालुका धारूर), पद्मपाणि राजकीय उघोजक पुरस्कार वसंतराव किसनराव गायसमुद्रे वडीगोद्री ता. अंबड जि.जालना यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप तरकसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांद्वारे दिली आहे. पुरस्कार मिळालेल्या सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.