नागरिकांत नाराजीचा सूर कळताच जॉन्सन जनता दरबारात

बीड (रिपोर्टर): जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जनता दरबार भरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून शेकडो लोक जनता दरबारासाठी हजर राहिले. मात्र दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्हाधिकारी जनता दरबारात न आल्यनो नागरिकांनी नाराजीचा सूर काढला. याची कुणकुण जॉन्सन यांना होताच ते बीडच्या आसपास खाली जनता दरबारात आले. या वेळी साठ ते सत्तर लोक उपस्थित होते. पैकी अनेकांच्या तक्रारी बीड नगरपालिके बाबात होत्या. सध्या जिल्हाधिकार्यांचा जनता दरबार सुरू आहे.
बीडचे नवनियुक्त जिल्हाधिकारी विवेक र्जान्सन यांनी काल जनता दरबाराला सुरुवात केली. आठवड्यातील तीन दिवस सदरचा दरबार भरला जाणार आहे. काल सोमवार रोजी जनता दरबार भरल्यानंतर आज सकाळी अकरा वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर लोक या जनता दरबारात आपआपले कामे घेऊन डेरेदाखल झाले.
मात्र दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्हाधिकारी जनता दरबारात आले नाही. त्यामुळे काहीसा नाराजीचा सूर नागरिकांनी व्यक्त केला. तर काही जण वापस गेले. याची माहिती विवेक जॉन्सन यांना झाल्यानंतर ते जनता दरबारात आले. साठ ते सत्तर नागरीक या वेळी उपस्थित होते. यातील बहुतांशी तक्रारी या बीड नगरपालिकेबाबत दिसून आल्या. पाणीटंचाईसह अस्वच्छता यावर अनेकांच्या तक्रारी असल्याचे सांगण्यात आले. सध्या जनता दरबार सुरू आहे