पालकमंत्री अजितदादा पवार ते कार्यकारी अभियंता; धनंजय मुंडे यांनी फिरवली सूत्रे
परळी वैद्यनाथ रिपोर्टर –
परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना माजलगाव उजव्या कालव्यातून 24 तासांच्या आत पाणी सोडण्यात यावे तसेच यापुढील आवर्तन वेळेतच उपलब्ध करून द्यावे अशा सूचना आज माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केले आहेत.
धनंजय मुंडे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री इनामदार यांच्याशी भेटून चर्चा केली. त्यानंतर तातडीने जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून अधीक्षक अभियंता श्रीमती जगताप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून 24 तासांच्या आत परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना माजलगाव उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यास उशीर झाल्यामुळे उसासह उन्हाळी पिके अक्षरशः करपू लागली आहेत, याची कल्पना मिळताच धनंजय मुंडे यांनी कार्यकारी अभियंता श्री इनामदार यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यापासून ते अधीक्षक अभियंता पर्यंत सूत्र फिरवली. त्यामुळे आता परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना माजलगाव उजव्या कालव्यातून पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.