मस्साजोग ते केज दरम्यान घडली घटना
केज (रिपोर्टर) मस्साजोगहून केजकडे येत असलेल्या कंटेनरने रस्त्याने अनेकांना उडवले. यामध्ये चार जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान मस्साजोग ते केज या रस्त्यावर घडली. या घटनेने केज येथे एकच खळबळ उडाली.



आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान मस्साजोगहून केजकडे येत असलेला कंटेनर क्र.डी.डी.01 झेड.9771 ने रस्त्यावरून जाणार्या अनेकांना उडवले. यामध्ये चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे तर अनेक जण जखमी झाले.लोखंडी सावरगाव जवळ सदरचा ट्र्क पलटी झाला आहे