राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज परळी औष्णिक विद्युत केंद्रा अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंढे आदी उपस्थित होते. यावेळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी सादरीकरणाद्वारे औष्णिक विद्युत केंद्राबाबत माहिती दिली. यामध्ये प्रस्तावित संच क्रमांक-1 ची मंजुरी व उभारणी, सौर ऊर्जा प्रकल्प मान्यता, राखेचे प्रदूषण व उपाययोजना, औष्णिक विद्युत केंद्राच्या विश्रामगृहाचे नुतनीकरण, थर्मल परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे, थर्मल कॉलनी परिसरात वृक्ष लागवड, सौर ऊर्जा प्रकल्प, आदी विषयांबाबत आढावा घेण्यात आला. परळी औष्णिक विद्युत केंद्राबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आपले सहकार्य असेल असे श्री.पवार यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार व्यंकटेश मुंढे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आदी विकसीत होते.