
बीड, (रिपोर्टर) ः पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये चोरीची घटना घडली. चोरट्याने दरवाज्याचे नटबोल्ट तोडून आतमध्ये प्रवेश करत आतील गोडतेलाचे 15 किलोचे दोन डब्बे, चिल्लर व इतर साहित्य असा एकूण 24 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
विनोद रामनाथ बहिर रा. शिरापूर धुमाळ ता. शिरूर कासार यांच्या हॉटेलच्या पाठीमागील दरवाज्याचे नटबोल्ट तोडून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश करत आतील चहाचे पातीले, एक पोह्याचा कट्टा, रोख रक्कम 1500 रुपये, गोडतेलाचे डब्बे असा एकूण 24 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.