शासकीय महिला कर्मचार्याचे 74 हजाराचे दागिने चोरले

बीड, (रिपोर्टर) ः बीड शहरामध्ये दररोज कोठे न कोठे चोरीच्या घटना घडत आहेत. विशेष करून गर्दीच्या ठिकाणी अशा घटना जास्त घडत आहे. बसस्थानकात तर दोन दिवसाला चोर्या होत आहे. यामध्ये काही पुरूष तर काही महिला चोर्या करतात. शहरात महिला चोरांची टोळी सक्रिय असल्याचा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला. शासकीय कर्मचारी असलेल्या एका महिलेचे 74 हजार 700 रुपयांचे दागिने चार महिलांनी चोरले आहे. ही घटना शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मंगल यशवंतराव टाक रा. आदर्श गणेश नगर, जुना नगर नाका सदरील ही महिला साई मेडिकल या ठिकाणाहून जात होती. या महिलेचे 72 हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण व इतर दागिने नगदी 1700 रुपये असा एकूण 74 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चार अनोळखी महिलांनी चोरला. गर्दीचा फायदा घेऊन हे दागिने चोरले आहे. आपले दागिने चोरीला गेल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर या महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






