
राज्यात तीन हजार शेतकर्यांचा मृत्यू, मदत एकालाही नाही
कृषी विभागाने वित्त विभागाकडे मागितले 60 कोटी 33 लाख
बीड, (रिपोर्टर)ः- राज्यभरात लाडकी बहिण योजना बहुचर्चित ठरत असतांना या योजनेचे पडसाद मात्र अन्य योजनांवर पडत असल्याचे दिसून येते. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना मार्फत दिला जाणारा लाभ अद्याप कोणालाच मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. आता पर्यंत तीन हजार शेतकर्यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत एकाही शेतकर्यांच्या कुटूंबियांना याचा लाभ मिळाला नाही. त्यांना मदत मिळावी म्हणून कृषी विभागाने 60 कोटी 33 लाख रूपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात येते.
राज्यात लाडकी बहिण योजना सुरू झाल्यापासून त्या योजनेचे दुरोगामी परिणाम अन्य योजनांवर पडतांना दिसून येत आहेत.
शासनाच्या अन्य योजना पैकी आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सारख्या चांगल्या योजनांला निधी मिळत नसल्याचे दिसून येत असल्याने या योजना आणि या योजनेच्या अंतर्गत येणार्या लोकांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येते. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अंतर्गत अद्याप कोणालाही मदत मिळालेली नाही. राज्यात सुमारे तीन हजार शेतकर्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या नातेवाईकांना मदतीची नितांत गरज आहे. मात्र निधी नसल्यामुळे शेतकर्यांच्या नातेवाईकांना मदत मिळत नाही. कृषी विभागाने राज्याच्या वित्त विभागाकडे 60 कोटी 33 लाख रूपयांचा प्रस्ताव सादर केला खरा मात्र गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी पैसे द्यायला वित्त विभाग अद्यापतरी तयार झाल्याचे दिसून येत नाही.