
सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांची उपस्थिती
मातृभूमीसाठी बलिदान देणार्या शूरविरांना अभिवादन
बीड, (रिपोर्टर) ः भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करत आज शिवसेनेच्या वतीने बीड शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली होती. ही रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाली होती. या रॅलीमध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये हजारो शिवसैनिकांचा सहभाग होता. हातात तिरंगा घेऊन रॅलीमध्ये शिवसैनिक सहभागी झाले होते.
सैनिकांच्या शौर्याला सलाम करत मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी आज बीड शहरातून शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. ही रॅली सकाळी 11 वाजेच्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाली होती. देशभक्तीने ओथंबलेल्या हजारो शिवसैनिकांचा, नागरिकांचा रॅलीमध्ये सहभाग होता. या रॅलीमध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील रॅलीचे आयोजन जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, स्वप्निल गलधर यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. या वेळी मातृभूमीसाठी बलिदान देणार्या शूरवीरांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करत अभिवादन करण्यात आले.






