रस्त्यावर बेशरमाची झाडे लावून आंदोलन
बीड, (रिपोर्टर)ः- कामखेडा ग्रा.पं. अंतर्गत वित्त आयोगाचे पैसे खर्च करूनही नालीचे पाणी बाहेर काढण्यात आले नाही. पाणी रस्त्यावरच जमा होत असल्याने नागरीकांना येण्या जाण्यास त्रास सहन करावा लागत असल्याने आज काही गावकर्यांनी ग्रा.पं.च्या निषेधार्थ रस्त्यावर बेशरमाची झाडे लावून आंदोलन केले.
गेल्या काही दिवसापुर्वी कामखेडा येथे वित्त आयोगाचा पैसा नाली बांधकामासाठी खर्च करण्यात आला. त्यासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले. मात्र नालीचे पाणी एका बाजुला निघाले नाही ते रस्त्यावरूनच वाहू लागले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी जमा झाल्याने नागरीकांना येण्या जाण्या त्रास होवू लागला.आज काही गावकर्यांनी ग्रा.पं.च्या निषेधार्थ रस्त्यावर बेशरमाची झाले लावून निषेध करण्यात आला.






