
कोयाळच्या मुंडे कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर
किल्ले धारूर (रिपोर्टर): रात्री अचानक घरामध्ये साप घुसला, घरामध्ये झोपलेल्या दोन चिमुकल्यांच्या जवळ जात त्याने दोन्ही चिमुकल्यांचा चावा घेतला. या चाव्यात एकाच कुटुंबातील सख्ख्या दोन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना धारूर तालुक्यातील कोयाळ या गावात घडली. प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरामध्ये मुंडे कुटुंबियांवर हा दुर्दैवी प्रसंग ओढावला गेला. चावा घेतलेल्या दोन्ही भावंडांचा उपचार घेताना मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. धारूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या चिमुकल्यांच्या पार्थदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
या दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेची अधिक माहिती अशी अशी की, धारूर तालुक्यातील कोयाळ गावामध्ये मुंडे वस्ती आहे. या मुंडे वस्तीवर प्रदीप मधुकर मुंडे हे एका पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. सध्या मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतापोतात बिळात असलेले साप बाहेर निघत असल्याचे अनेक घटनाक्रमावरून दिसून येत आहे. काल रात्री प्रदीप मुंडे यांची सात वर्षाची मुलगी कोमल मुंडे व पाच वर्षाचा शिवम मुंडे हे रात्री घरामध्ये झोपले होते. त्या वेळी अचानक त्यांच्यावर अंगावर साप आला. त्या सापाने दोन्ही चिमुकल्यांना दंश केला. साप चावल्यानंतर दोन्ही मुलांची तब्येत प्रचंड बिघडली.
त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारा पूर्वीच दोघांचाही जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली. मुंडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्पदंशामुळे एकाच घरातील दोन निष्पाप जिवांचा गेलेला बळी त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी धारूरच्या रुग्णालयात आणण्यात आले. त्याठिकाणी त्या चिमुकल्यांचे पार्थदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. ही घटना वार्यासारखी तालुकाभरात पसरली. सर्वत्र या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात