
रस्त्यावर आले मोठे दगड, अपघात होण्याचा धोका
किल्ले धारूर (रिपोर्टर ): धारूर तालुक्यातील ढगेवाडी नजीक चारदरी रस्त्यावर दरड कोसळली आहे. या दरडीतील मोठे दगड रस्त्यावर आले आहेत यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे तसेच अपघात होण्याचा धोका वाढला आहे या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
तालुक्यातील चारदरी हे हनुमान भक्ताचे मोठे गाव आहे. या ठिकाणी मोठे हनुमान मंदिर असून प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी मोठी गर्दी असते याच रस्त्यावर ढगेवाडी गावाच्या नजीक दरड उसळी आहे या डोंगरावरील मोठे मोठे दगड रस्त्यावर आले आहेत सुदैवाने अपघात झाला नाही. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत अचानकपणे आणखी दरड कोसळून अपघात होऊ शकतो यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन यातील मोठे दगड बाजूला करावे जेणेकरून अपघात होणार नाहीत परंतु या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
अपघात होऊ नयेत यासाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. भाविक भक्त तसेच चारद
री गावातील सर्व नागरिक त्याचबरोबर कोठरबन परिसरातील लोकही याच मार्गाने जातात यामुळे येथे वर्दळ असते. येथे अपघात होऊ नये यासाठी त्वरित प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.