
बीड (रिपोर्टर): बीड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष मारुती जगन्नाथ गायकवाड यांचे आज सकाळी दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 50 वर्षे होते. त्यांच्या पार्थीवदेहावर आज सायं. 5 वा. मोंढा येथील अमरधाम स्मशानभूमीत होणार आहे.
बीड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष मारुती जगन्नाथ गायकवाड हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले. ते आसाराम गायकवाड यांचे छोटे बंधू आहेत. त्यांच्या पार्थीवदेहावर सायं. 5 वा. मोंढा येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली सह मोठा परिवार आहे. गायकवाड कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.