
बीड, (रिपोर्टर)ः- नेकनूर पासून काही अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहा दरम्यान प्रदिम मिश्रा यांची शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली. या कथेचे श्रवण करण्यासाठी लाखो भावीक चाकरवाडीमध्ये आहेत. भावीकांसाठी मोठ्या प्रमाणात मंडप उभारण्यात आला. काल वादळी वार्यासह पाऊस झाला यामुळे काही प्रमाणात मंडपाचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसापासून चाकरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सप्ताहात प्रदिप मिश्रा यांची शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली. कथा ऐकण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील भावीक चाकरवाडीमध्ये आलेले आहेत. भावीकांच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात मंडप व इतर सुविधा उपलब्ध करण्यात आली. काल नेकनूर परिसरामध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. त्यात मंडपाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
भावीकांच्या राहण्याची सोय आशिर्वाद लॉन्समध्ये
चाकरवाडी येथील मंडपाचे नुकसान झाल्यानंतर भावीकांच्या राहण्याची सोय बार्शी रोडवर असलेल्या आशिर्वाद लॉन्स मंगल कार्यालयामध्ये मोफत करण्यात आली आहे. तरी सदरील भावीकांनी या ठिकाणी यावे असे आवाहन ह.भ.प हरिभाऊ जोगदंड यांच्या वतीने करण्यात आले आहे.