डीबीटी वेबसाइट बंद असल्याने पगारी रखडल्या
बीड, (रिपोर्टर)ः- संजय गांधी श्रावणबाळ या योजने अंतर्गत लाभार्थ्यांची केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. केवायसी करण्यासाठी लाभार्थी तहसिल कार्यालयामध्ये येवून बसतात. मात्र वेबसाईट बंद असल्याने केवायसी होत नाही. केवायसी नसल्याने कित्येक लाभार्थ्यांच्या पगारी बंद झाल्याआहेत. याबाबत प्रशासकीय अधिकार्यांनी वेळीस दखल घ्यावी नसता आंदोलन करण्यात येईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता वाघमारे यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून संजय गांधी श्रावणबाळ योजने अंतर्गत लाभार्थ्यांची केवायसी केली जात आहे. तहसिल कार्यालयामध्ये सदरील केवायसी होत आहे. मात्र त्याची वेबसाइट चालत नसल्याने वयोवृध्दांना दिवसभर कार्यालयासमोर ताटकळत बसावे लागत आहे. यामध्ये काही अपंगाचा देखिल समावेश आहे. केवायसी होत नसल्याने वयोवृध्दांना पगारी मिळत नाही. याबाबत तहसिलदार यांनी दखल घ्यावी व निराधारांची केवायसी तात्काळ करून घेण्यासाठी उपाययोजना आखाव्यात नसता आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संगीता वाघमारे यांनी दिला आहे.







