वडवणी (रिपोर्टर):- रात्री चोरट्यांनी वडवणी शहरातील मुख्य बाजारपेठ टार्गेट करत चार दुकाने फोडले. या दुकानातून लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून वडवणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. एकाच रात्री तब्बल चार व्यापार्यांचे दुकाने फोडल्याने व्यापारी भयभीत झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
याबाबत व्यापार्यांनी दिलेली माहिती अशी कि, वडवणी शहरात मध्यरात्री पाऊस झाला यांचाच फायदा घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भानुदास मस्के यांच्या मालकीचे असणारे ओम हॉटेलचे शटर कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश करत गल्यामधील दोन लाख रुपये घेऊन लंपास केले आहेत. तर याच ठिकाणी सीसीटिव्ही कँमेरा असल्याने शेटरचे कुलूप तोडलेले आणि आत मध्ये प्रवेश करत पैसे मोजत असलेला चोरटा कैद झाला आहे.तर यांच शेजारी असलेल्या बेकरी दुकानाचे कुलूप तोडले परंतु आतमध्ये प्रवेश केला नसल्याचे समजले आहे. तर याच हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावरील जिवाजी महाले चौकातील श्रीराम शेळके यांच्या मालकीचे बद्रीनाथ शुज हाऊस यादुकानाचे शटर कुलूप तोडत आत प्रवेश करत गल्यातील दिड हजार रुपये लंपास केले आहे. याच शेजारी असणारे पप्पु शेळके यांच्या मालकीचे आदर्श अग्रो एजन्सी या दुकानातील अशाच प्रकारे चार हजार रुपये लंपास केले आहेत.परंतु याठिकाणी सीसीटिव्ही कँमेरा नसल्याने चोरटा कैद झाला नाही. यानंतर चकोर जैन यांच्या मालकीचे असणारे कल्पतरु कलेक्शन या कापड दुकानाचे शटर कुलूप तोडले परंतु याला चावी असल्याने शटर उघडण्याचा प्रयत्न केला परंतु शटर वर न गेल्याने येथे चोरट्याचा डाव फसला आहे. येथील प्रकार देखील सीसीटिव्ही कँमेरात चोरट्यासह कैद झाला आहे.यानंतर थेट पोलीस ठाण्याच्या आवारातून दिसणारे आणि स्व.नाईक चौकातील विजय मायकर यांच्या मालकीचे असणारे न्यू बालाजी फर्निचर या दुकानातून देखील 23 हजार रुपये लंपास करत फँन यासह इलेक्ट्रिक वस्तु देखील या दुकानातून लंपास केल्या आहेत.तर या घटना मध्यरात्री पाऊस चालू असताना घडलेल्या आहेत.यामुळे शहरातील व्यापारी वर्ग भयभित झाला असून मुख्य रस्त्यावरील दुकान फोडून चोरट्यानी पोलीसांच्या अकामगिरी चक्क शिक्कामोर्तब करत चार दुकानात नगदी रक्कमेचा डाव साधला तर दोनमध्ये घाव अयशस्वी ठरला असल्याच या प्रकरणावरुन दिसून येत आहे.
खाकी समोर आव्हान
मागील काळात वडवणी पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख व पोलीसांचा कारभार यान त्या कारणाने चर्चिला जात होता.आता नविन ठाणेप्रमुख आनंद कांगुणे यांच्याकडून खाकी कायदा दाखवेल अशी अपेक्षा होती.परंतु ते रुजू झाल्यापासून छोट्या मोठ्या गुन्ह्यात वाढ झाली आहे.तर गुन्हेगारीमध्ये खाकी धाक राहिला नसल्याच दिसून येत आसताना एकाच रात्रीत सहा दुकान फोडून काही दुकानातील नगदी रुपये लंपास करत चोरटा सीसीटिव्ही कँमेरात कैद झाला असल्याने आता प्रकरणाचा वडवणी पोलीस कसा छडा लावतात कि नाही याकडे शहराचे लक्ष लागून खाकी समोर आव्हान ठरले आहे.तर याबाबत ठाणेप्रमुख कांगुणे यांच्याशी माहिती घेण्यासाठी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधाला आसता त्यांनी फोन उचलला नाही.