
डीएसससीमुळे घरकुल धारकांचे हप्ते रखडले
बीड, (रिपोर्टर)ः- बीड पं.स.तीच्या बीडीओ पदाचा पदभार कांबळे मॅडम यांनी घेतल्यानंतर त्या फक्त दोनदा कार्यालयामध्ये आल्या. त्यानंतर त्या कार्यालयाकडे फिरकल्या नाहीत. सध्या घरकुलाची कामे सुरू आहेत. घरकुलाचे हप्ते बीडीओच्या डीएससीशिवाय निघत नाहीत. त्यांची डीएससी नसल्याने घरकुल धारकांचे पैसे रखडले आहेत.
तत्कालीन बीडीओ वानखेडे हे दिर्घ रजेवर गेल्यामुळे बीड पं.स.तीचा पदभार कांबळे मॅडम यांच्याकडे देण्यात आला आहे. कांबळे मॅडम यांनी पदभार घेतल्यानंतर त्या फक्त देानदा कार्यालयात आल्या त्यानंतर त्या कार्यालयाकडे फिरकल्या नाहीत. त्यांची डीएससी नसल्यामुळे घरकुल धारकांचे हप्ते काढता येत नाहीत. तालुक्यातील घरकुल धारकांचे हप्त्यांचे पैसे रखडून पडलेआहेत. दरम्यान याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेवून घरकुल धारकांचे पैसे तात्काळ खात्यावर जमा करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावे अशी मागणी केली जात आहे.