
नवी दिल्ली (रिपोर्टर): केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग आधारित वार्षिक पासची घोषणा केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत फक्त 3 हजार भरून वर्षभर किंवा 200 ट्रिपपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. ही योजना 15 ऑगस्टपासून देशभर लागू होणार आहे.
केंद्र सरकार 3 हजार रुपयांचा फास्टॅग-आधारित वार्षिक पास सादर करत आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिली. येत्या 15 ऑगस्टपासून हा पास जारी केला जाणार असून, तो केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. गडकरी यांनी सांगितले की, हा पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा 200 फेर्या पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल) वैध राहील. वार्षिक पासमुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून सहज आणि किफायतशीर प्रवास करता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
नवीन धोरणाचा उद्देश काय?
नवीन धोरण 60 किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोलनाक्यांसंदर्भातील जुन्या समस्यांचे निराकरण करते आणि एकाच, परवडणार्या व्यवहाराद्वारे टोल भरणे सुलभ करते. टोलनाक्यांवरील वेळ कमी करणे, वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहन मालकांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणे, हा या वार्षिक पासचा उद्देश आहे, असेही गडकरींनी स्पष्ट केले.
कोण असणार पात्र?
ही योजना फक्त खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध असेल.
पास एकदा सक्रिय केल्यावर तो एक वर्ष किंवा 200 प्रवासांपर्यंत, यापैकी जे आधी संपेल, तेवढ्यासाठी वैध असेल.
पास कसा काढायचा ?
नागरिक ’राजमार्ग यात्रा’ या अधिकृत अॅपद्वारे हा पास अॅक्टिवेट करू शकतील.
तसेच फास्टॅग(राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.
ReplyReply allForwardAdd reaction









