
वाघमारे यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी
बीड, (रिपोर्टर)ः- वीज वितरण कंपनीने तंत्रज्ञ वाघमारे यांच्यावर विनाकारण निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्या वरील कारवाई रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर क्रांतीकारी लाईन स्टाफ सेनेच्या वतीने धरणेआंदोलन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापुर्वी विज वितरण कंपनीने तंत्रज्ञ लहु योगीराज वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. चर्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासस्थानाच्या वीज कनेक्शन संदर्भात ही कारवाई करण्यात आली. मात्र यामध्ये वाघमारे यांचा कसलाही सहभाग नसतांना त्यांच्या विरोधात जाणीवपुर्वक कारवाई करण्यात आली आहे. सदरील निलंबन रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज महावितरण कार्यालयासमोर क्रांतीकारी लाईन स्टार सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.








