
शेतात जुगार खेळणार्यांच्या हातात बेड्या
चकलांबा (रिपोर्टर)- सोमवारी रात्री गस्त घालत असताना एका शेतात जुगार खेळणार्या सहा जणांना चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी चार मोटारसायकल व सहा मोबाईल असा 3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सपोनि संदीप पाटील हे स्टाफसह सोमवारी रात्री गस्त घालत असताना, तरडगाव शिवारातील एका शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली. गस्त घालत असताना ही बाब समोर आल्यानंतर चकलांबा पोलिसांनी त्या ठिकाणी धाड मारल्यानंतर पोलीसांना पाहून जुगार्यांनी पळ काढला. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून सहा जणांना पकडले. या कारवाई मध्ये आरोपींकडून चार मोटरसायकल, सहा मोबाईल व रोख रक्कम 43,300 असा एकूण 3 लाख 58 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी चकलांबा पोलीस स्टेशन मध्ये 1) शहादेव यादव ढोणे रा. कासरवाडी ता.गेवराई 2) रामेश्वर तुळशीराम गाजरे रा.शेकटा ता. गेवराई 3) संपत शंकरराव खेडकर रा चकलांबा ता गेवराई 4) भागवत शिवराम शिरसाट रा तरडगव्हाण ता शिरूर 5) बदाम हरिभाऊ महानोर रा कसरवाडी ता गेवराई 6) पांडुरंग शेषराव बिचकून रा.चकलंबा ता गेवराई अशा 6 जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक श्री. राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील,पो उप नि पवनसिंग अंबरसिंग जंघाळे, पोशिं कैलास खटाणे, पोशिं 89 किरण मिसाळ,पोशिं प्रशांत घोंगडे यांनी केली.








