
वनविभागाने केली काल पाहणी
बीड (रिपोर्टर): वांगी शिवारातील एका वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याचे समोर आल्यानंतर शिवारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती वनविभागाला झाल्यानंतर कर्मचार्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली आहे.
वांगी शिवारातील एका शेतकर्याच्या वासराचा बिबट्याने फडशा पाडला. बिबट्या आल्याची माहिती झाल्यानंतर शेतकर्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वांगी, जरुड, शिवणी, कुटेवाडी, भवानवाडी, बाभळखुंटा, ढेकणमोहा, बोरफडी, मौजवाडी, बकरवाडी, घाटसावळी, निर्मळवाडी, पोखरी, मैंदा या परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. काल वन विभागाच्या कर्मचार्यांनी वांगी येथे जावून पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले आहे.







