
सिरसाळा-परळी महामार्गावर अपघात
सिरसाळा (रिपोर्टर): भरधाव चालणार्या हायवा चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी दुचाकी त्या हायवेवर जावून धडकली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिरसाळा गावाजवळ असलेल्या जैन पेट्रोल पंपाजवळ घडला.
याबाबत अधिक असे की, सिरसाळ्यापासून जवळ असलेल्या सुकळी येथील प्रा. अमोल लव्हाळे हे आज सकाळी आपली मोटारसायकल एम.एच. 44 आर. 9081 या वरून जात होते. त्यावेळी बीड-परळी महामार्गावरील सिरसाळाजवळ असलेल्या जैन पेट्रोल पंपासमोर रस्त्याचे काम चालू आहे. त्यावेळी समोर एक हायवा चालत होता. अचानक त्याने ब्रेक लावला. त्याचवेळी लव्हाळे यांची मोटारसायकल त्या हायवावर जावून आदळली. यात लव्हाळे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना परळी येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. मात्र त्याठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रा. लव्हाळे यांच्या मृत्यूने सुकळी गावासह परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.







