
पाटोदा (रिपोर्टर): तू दिलेला झाडे तोडणार्या मजुराने चांगली झाडे तोडली नाही, असे म्हणत लाईनमनला तिघा जणांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तिघा जणांविरोधात पाटोदा पोलीस ठार्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण बाळू नाईकनवरे हे पाटोदा येथे लाईनमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मुजम्मील सलीम शेख, राहील सलीम शेख, सलीम शेख या तिघांनी मारहाण केली. सदरील ही मारहाण झाडे तोडण्यासाठी दिलेल्या मजुराने काम चांगले केले नाही, या कारणावरून करण्यात आली आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात नाईकनवरे याचंया फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







