चव्हाणांना अटक करा, कृषीमंत्र्याची हाकालपट्टी करा, तीव्र निदर्शने
बीड (रिपोर्टर): सभागृह चालू असताना राज्याचे कृषीमंत्री सभागृहात पत्ते खेळतात. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, या मागणीचे निवेदन देण्यासाठी गेलेले छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. या प्रकरणात सुरज चव्हाण यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि कृषीमंत्री माणिक कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आज छावा संघटनेच्या वतीने आंदोल करण्यात आले.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने बीडमध्ये तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात आले. छावा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत हातात जाहीर निषेधाचा बोर्ड हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पत्ते उधळत कृषीराज्यमंत्र्यांची हाकालपट्टी करा, सुरज चव्हाण यांना अटक करा अशी मागणी या वेळी कार्यकर्त्यांनी केली. सदरचे आंदोलन हे छावा संघटनेचे अध्यक्ष अशोक रोमण याचंया नेतृत्वात झाले.







