बीड : ऑनलाईन रिपोर्टर
दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद बीड अंतर्गत कार्यरत दिव्यांग अधिकारी, कर्मचारी व शिक्षक–शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या UDID कार्ड पडताळणी मोहीमेत प्रमाणपत्रांची वैधता तपासली जात आहे. या पार्श्वभूमीवर ८ ऑक्टोबर २०२५ रोजी स्काऊट गाईड भवन, बीड येथे विशेष पडताळणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.



मात्र शिबिरास उपस्थित राहून UDID कार्ड सादर करण्याच्या आदेशानंतरही काही शिक्षकांनी आपली प्रमाणपत्रे सादर केली नाहीत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ९१ नुसार अशा प्रकरणात कठोर कारवाईची तरतूद असल्याने शिक्षण विभागाने कडक निर्णय घेत १४ शिक्षकांना निलंबित केले आहे.
निलंबित शिक्षकांची यादी :
- संपत्ती जाधव रवींद्र धोंडीबा, स.शि., जि.प.प्रा.शा. हातगाव, ता. केज
- श्रीमती माने उषा विठ्ठल, स.शि., जि.प.शाळा चौसाळा, बीड
- संपत्ती भोसले रामचंद्र छत्रगुण, स.शि., जि.प.शाळा चौसाळा, बीड
- श्रीमती चोपडे कल्पना गेणू, स.शि., जि.प.प्रा.शा. डोईठाण, ता. आष्टी
- श्री. शिनगारे हेमंत कारभारी, स.शि., जि.प.प्रा.शा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई
- श्रीमती कंटाळे संजीवनी विक्रम, स.शि., झेडपी प्रा.शाळा रायमोहा, शिरुर
- श्री. सय्यद नवाज मौलासाहेब, स.शि., G.P.P.S.S. राधाकृष्ण नगर सिरसाळा, परळी
- श्रीमती मुंडे अंजली मारोतीराव, स.शि., G.P.P.S.S. गवळीवस्ती, बीड
- श्रीमती देवगुडे शैला साहेबराव, स.शि., G.P.P.S.S. गांधीनगर मराठी, बीड
- श्री. मनोज नरसिंगराव सुर्यवंशी, स.शि., जि.प.प्रा.शा. जोडवाडी (उजनी केंद्र), अंबाजोगाई
- श्री. भोसले आश्रुबा विश्वनाथ, स.शि., जि.प.के.प्रा.शा. येळंबघाट, बीड
- श्री. वाटमांड सिद्धू आसाराम, स.शि., जि.प.प्रा.शा. भोपालेवस्ती, पाटोदा
- श्री. भोसले प्रकाश बलभीम, स.शि., जि.प.प्रा.शा. पिठी, पाटोदा
- श्रीमती बहिर सुनंदा धोडोबा, स.शि., जि.प.के.प्रा.शा. कुसळंब, पाटोदा
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, UDID कार्ड पडताळणीसाठी पुन्हा पुन्हा नोटिसा देऊनही अनुपस्थिती दाखवणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई अनिवार्य आहे. प्रमाणपत्रे न सादर करणाऱ्या संबंधित सर्व शिक्षकांवर विभागीय चौकशी सुरू केली जाणार असून, पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील.
या कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील इतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, दिव्यांग सवलतींचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासन कठोर भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.








