बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेटने खातेदारांची वाट लावली असून खातेदारांचे कोट्यावधी रूपये मल्टीस्टेटमध्ये अडकून पडलेले आहेत. या प्रकरणी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर गुन्हे देखिल दाखल झालेले आहेत. शहरातील सारडा कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या शाहु अर्बन के्रडीट सोसायटीमध्ये 23 लाख 70 हजार 115 रूपये मुदत ठेव ठेवली होती. सदरील खातेदारांनी वेळोवेळी पैशाची मागणी करूनही त्यास पैसे दिले जात नसल्याने खातेदाराने थेट न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने संस्थापकासह 19 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
रविंद्र गुलाबराव नाईकवाडे (रा.रविशंकर विद्यालयाजवळ, पिंपरगव्हाण, ीड) यांनी शाहु अर्बन को अॅप. सोसायटी लि.बीड यामध्ये मुदत व बचत ठेव असे एकूण 23 लाख 70 हजार 115 रूपये ठेवले होते. त्यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी सोसायटीकडे वारंवार पैशांची मागणी केली. मात्र पैसे मिळत नसल्याने त्यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखिल दाखल केली हेाती. पोलिसांनीही याची दखल घेतली नाही. शेवटी न्यायालयात त्यांनी दाद मागितली. न्यायालयाने शहर पोलीस स्टेशन यांना आरोपी हनुमंत उध्दव गात (संस्थापक अध्यक्ष), मदन कचरू काशीद (अध्यक्ष), रामकिसन गात ( संचालक), सविता गात (संचालिका), सोनाली धांडे (संचालिका), ज्ञानेश्वर धांडे (सचिव), नानासाहे शेंबडे (ंसंचालक), गणेश धांडे (संचालक), छबुबाई माने (संचालिका), वैभव कुटे (संचालक), प्रल्हाद डोंगरे, अविनाश गात (संचालक), अमोल शिरपते (संचालक), प्रकाश गोरे (संचालक), अमोल राऊत (शाखा व्यवस्थापक), मनोज वखरे, प्रियंका भोपळे, एकनाथ खंडागळे, शरद राठोड या 19 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. फिर्यादीच्या वतीने अॅड.शरद काळे यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड.अयाज शेख, ए बी पौळ यांनी सहकार्य केले.









