वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील महावितरण सब स्टेशनवर विविध साहित्याची चोरी करून अज्ञात चोरट्यांनी एकूण 3 लाख 41 हजार 51 रुपायांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना दोन दिवसापूर्वी घडली असून काल दुपारी अज्ञात चोरट्या विरोधात साईट इन्चार्ज यांनी वडवणी पोलिसात रितसर तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
चिंचाळा येथे महावितरणचे सब स्टेशन कार्यरत आहे. या ठिकाणाहून दि. 5 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वा. ते दि. 6 डिसेंबर 2025 सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संरक्षण जाळीला कट करून आत मध्ये प्रवेश करत 1). 11 के.व्ही 800ए एम पी 4 सेट कि अं. 15,2000/-रु, 2). 19 कोर केबल 70 मिटर कि.अं. 47, 574/- रु, 3). 12 कोर केबल 230 मिटर किं. अं. 31,460/- रु., 4). 2 कोर केबल 90 मिटर कि.अं. 7, 667/- रु., 5). कटर मशीन 1 व स्पनर कि.अं. 18, 350/- रु., 6). पॉथर कंडक्टर 200 मिटर जुनी वापरती कि.अं. 84000/- रू., असा एकुन 3,41,051/ रुपये असा वरिल वर्णनाचा ईलेक्ट्रिकल्स मुद्देमाल साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती होताच येथील साईट इन्चार्ज जीवन लहू राठोड ( वय-25 वर्ष रा.पाचेगाव ता. गेवराई हल्ली मुक्काम वडवणी जि. बीड ) यांनी वडवणी पोलीस स्टेशनला याबाबत रीतसर तक्रार देत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर याबाबत तक्रारदाराने तक्रार काल दुपारी 3 वाजता देऊन देखील वडवणी पोलिसांकडून आज दुपारी 1 वाजेपर्यंत पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेलेले नाहीत. यावरून पोलिसांना घटनेचे गांभीर्य आहे कि नाही ? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित राहत आहे.









