मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी अधिक वाढ
सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात
बीड, (रिपोर्टर)ः- मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या सुरूच असून आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाकडून विशेष काही प्रयत्न केले जात नाहीत. या वर्षी मराठवाड्यावर आसमानी संकट कोसळल्याने मराठवाड्यातील 40 लाख हेक्टरपेक्षा जास्ती शेतीपिेकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यात आत्महत्याचा आकडा वाढला. वर्षेभरामध्ये मराठवाड्यात 1129 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक 256 शेतकर्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आत्महत्याचा आकडा वाढला. 2024 साली 984 शेतकर्यांनी मृृत्युला कवटाळले होते.
मराठवाडा हा मागास भाग म्हणुन ओळखला जातो. मराठवाड्यात सिंंचन, रोजगाराचे साधन नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेले आहेत. मराठवाड्याच्या विकासाच्या नुसत्या बाता मारल्या जातात. प्रत्यक्षात मात्र विकास केला जात नाही. मराठवाड्याच्या शेतकरी आत्महत्याची संख्या दिवसे दिवस वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. यंदा आस्मानी संकट कोसळल्याने मराठवाड्यातील 40 लाख हेक्टरपेक्षा जास्ती शेतीपिकाचे नुकसान झाले. यानुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने तुटपूंजी मदत केलेली आहे. यामदतीवर काय होणार? मराठवाड्यातील शेतकर्याभोवती कर्जबाजारीपणा, नापिकी, सावकारकीचा विळखा, शेती मालाला योग्य भाव नसनं, प्रशासनाची उदासिनता इत्यादी कारणे आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी शेवटी आत्महत्याचा मार्ग पथकारू लागला. वर्षेभरात मराठवाड्यातील 1129 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक आत्महत्या या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. जिल्ह्यातील 256 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळलेले आहे. दरम्यान मराठवाड्यात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या बाबत केंद्र आणि राज्य सरकारने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.









