नेकनूर (रिपोर्टर): केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेची होरपळ होत असून सध्या गॅसची टंचाई निर्माण होत आहे. शासनाच्या निषेधार्थ काल नेकनूर येथे विविध पक्ष-संघटनांच्या वतीने बसस्थानकासमोरर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये अनेकांची उपस्थिती होती.
देशात सध्या गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची होरपळ होऊ लागली. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून केंद्र सरकारच्या निषेधार्थ काल ऑल इंडिया पँथर सेना, वंचित बहुजन आघाडी, शिवशक्ती-भीमशक्ती, शिवसेना ठाकरे गट, शिवसंग्राम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात अलो. या वेळी नितीन सोनवणे, अजय सरवदे, मोरे पाटील, गोरक्षनाथ कदम, रायचंद कापसे, दीपक भालेराव, मयूर निर्मळ, ओमकरे, दिनेश आवळे, अशोक करडे, रवि गायकवाड, बबलू गायकवाड, सिद्धार्थ कानडे, विशाल इंगोले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.








