बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात यंदा अतिरिक्त ऊसाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गेवराई आणि माजलगाव या दोन तालुक्यात जास्त प्रमाणात ऊसाची लागवड झालेली आहे. गेवराई तालुक्यात आजपर्यंत 27 लाख 83 हजार मे.टन ऊसाचे गाळप झाले असून जिल्ह्यात अंदाजे तीन ते साडेतीन लाख मे.टन ऊस शिल्लक आहे. गेवराईत तालुक्यातील 40 हजार मे.टन ऊस शिल्लक असून तालुक्यातील शेतकर्यांचा 27 कारखान्यांसह गुर्हाळाने ऊस गाळप केला आहे.
दोन वर्ष चांगला पाऊस पडल्याने मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र वाढले. ऊसाचे उत्पादन वाढल्यामुळे गाळपाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. मे एन्डपर्यंत सर्व ऊसाचे गाळप करण्याचे टार्गेट साखर आयुक्तालयाने ठेवलेले आहे. गेवराई आणि माजलगाव तालुक्यात सर्वाधिक ऊसाची लागवड असून गेवराई तालुक्यात आतापर्यंत 27 लाख 83 हजार 970 मे.टन ऊस गाळप झाला. यामध्ये कंचेश्वर शुगर-121790 टन, गोकुळ शुगर-134000 टन, मातोश्री सोलापुर-45000 टन, सिध्देश्वर-90000 टन, लोकमाऊली-45000, सिध्दनाथ सोलापुर-19000, साईकृपा-55000, पारनेर-65000, गंगामाई-345000, छत्रपती संभाजी-245000, रामेश्वर-110000, जयमहेश-68000, वैद्यनाथ-18000, एसपी शुगर-9000, स्वराज-65000, घृश्नेश्वर-45000, केदारेश्वर-195000, भेंडा-25000, वांबोरी-75000, राहुरी-55000, नेवासा-38000, वाळकी-86000, यु टेक-25000, नाथ-45000, सिल्लोड-35000, गुळमेश्वर-125000, जय भवानीने 595000 लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. सदरील ही आकडेवारी 15 मे पर्यंतची असून आणखी तालुक्यात 40 हजार मे.टन ऊस शिल्लक असून जिल्हाभरात तीन ते साडेतीन लाख मे.टन ऊस शिल्लक आहे.