बीड (रिपोर्टर) कर्जबाजारी झालेल्या एका 28 वर्षीय तरुण शेतकर्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना शिरूर तालुक्यातील बावी येथे घडली.
शरद अंकुश ढाकणे (वय 28 वर्षे, रा. बावी ता. शिरूर) या कर्जबाजारी झालेल्या तरुण शेतकर्याने स्वत:च्या शेतामध्ये 21 मे 2022 रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या शेतकर्याला उपचारासाठी तात्काळ नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रात्री सव्वा अकरा वाजता उपचारा दरम्यान शेतकर्याचा मृत्यू झाला.