धारूर तालुक्यातील 9000 विद्यार्थी हंगामी वस्तीग्रहाचा घेतात लाभ
तालुक्यात 85 ऊसतोड हंगामी वसतिगृह
बीड जिल्ह्यात सर्वात जास्त धारूर तालुक्यात ऊसतोड मजूर
किल्ले धारूर (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजूर ऊस तोडणी साठी कारखान्यात जातात या ऊसतोड मुजरांचे मुले-मुली कारखान्याकडे जाऊ नये यासाठी हंगामी वस्तीगृह सुरू करण्यात येतात परंतु अद्यापही ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी असणारे हंगामी वस्तीगृह आणखी सूरू न झाल्यामुळे धारूर तालुक्यातून दररोज शेकडो विद्यार्थ्यांचे कारखान्याकडे स्थलांतर होताना दिसून येत आहे प्रशासन हंगामी वस्तीगृह सुरू नसल्यामुळे हे स्थलांतर रोखण्यास अपयशी होताना दिसून येत आहे.
धारूर तालुक्यात गेल्यावर्षी ऊसतोड मजुरांच्या पाल्यासाठी 85 हंगामी वस्तीगृह सुरू होते यातून तब्बल आठ ते नऊ हजार ऊसतोड मजुरांचे पाल्य याचा लाभ घेत होते परंतु यावर्षी आद्यपही हंगामी वस्तीग्रह सुरु नसल्यामुळे ऊसतोड मुजरांनी आपल्या विद्यार्थ्यांची खाणेपिण्याची सोय होत नसल्यामुळे सर्व मुले मुली कारखान्याकडे घेऊन जाताना दिसून येत आहेत परंतु यामुळे ही लहान बालके शिक्षणापासून वंचित राहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच विद्यार्थ्यांचे कारखान्याकडे जाणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाने हंगामी वस्तीगृह त्वरित सुरू करायला हवेत.
हंगामी वस्तीगृह बाबतीत बीड जिल्ह्यातून धारूर गटशिक्षण कार्यालयाने सर्वात वेगाने काम करत 80 प्रस्ताव मागून घेतले आहेत ते मंजूर देखील केले आहेत आजही आठ प्रस्ताव येणार आहेत शासनाचे पत्र दोन दिवसापूर्वी मिळाले लागलीच कारवाई केली असून स्थलांतर रोखण्यासाठी धारूर शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. लवकरच हंगामी वस्तीगृह सुरू होतील याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना यापूर्वीच कल्पना दिली आहे.
-गणेश गिरी
गटशिक्षणाधिकारी धारूरआम्ही आमच्या मुलाबाळांना खाण्यापिण्याची सोय नसल्यामुळे तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी हंगामी वस्तीगृह सुरु नसल्याने आमच्या सोबत मुलांना कारखान्यावर घेऊन जात आहोत. माझा मुलगा तिसरी व मुलगी पाचवीत शिकते शासनाने वस्तीगृहाची सोय लवकर करावी.
-अर्जुन माने
ऊसतोड कामगार उंबरेवाडी