नवी दिल्ली (वृत्तसेवा):- प्रथमत:च काँग्रेस पक्षाच्या इतिहासामध्ये मतदानाद्वारे अध्यक्षपदाची निवडणूक होऊन गांधी घराण्याच्या बाहेरील मल्लिकार्जून खरगे हे प्रचंड बहुमताने विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना केवळ 1072 मतांवर समाधान मानावे लागले आहे.
आतापर्यंत गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष काही वेळा अपवादाने झालेला आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी काम पहात होत्या. त्यानंतर काँग्रेस पक्षाने मतदानाद्वारे अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर गांधी घराण्याने पक्षाशी एकनिष्ठ असलेले राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरवले. काल यासाठी मतदान झाले. एकूण 9 हजार 385 मतांपैकी खरगे यांना 7 हजार 997 मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरूर यांना 1072 मते पडली. तर 416 मते अमान्य करण्यात आली.