बीड (रिपोर्टर) मौजे धारुर येथील देवस्थान गुलजार मस्जीद च्या इनामी जमीनी प्रकरणात दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक 25/10/2022 रोजी सकाळ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सय्यद फयाज इनामदार सालाहोद्दिन यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे.
असे की मौजे धारुर येथील देवस्थान गुलजार मस्जीद सेवेच्या अटीवर मौजे धारुर येथे इनामी जमीन सर्वे नं . 20 क्षेत्र 21 एकर 06 गुंठे , सर्वे नं 69 क्षेत्र 25 एकर 37 गुंठे , सर्वे नं . 77 क्षेत्र 23 एकर 08 गुंठे आहे सदरील देवस्थान जमीन मुन्तखब क्र . 1166 अन्वये माझे पंजोबा सय्यद निजोमोद्दिन पि . सय्यद कादर व सय्यद तकी पिता सय्यद कादर यांच्या नावाने नमुद देवस्थान जमीन सेवेच्या अटीवर खिदमत बहाल करण्यात आली होती . तरी सय्यद बाबामिया सय्यद करीमोद्दिन रा . मौजे धारुर यांनी वर नमुद देवस्थान जमीनीवर स्वतः च्या मुलांना वाटून दिल्याचे दाखवत स्वतः सदरील जमीनीचे मालक असल्याचा दावा करीत आहे . सय्यद बाबा मियाँ पि . करीमोद्दिन रा . मौजे धारुर यांचा मुलगा सय्यद सादेक सय्यद बाबामियाँ भ्रष्टाचार निर्मूलन अभियान समितीच्या मराठवाडा अध्यक्ष पदावर असल्याचा गैर वापर करुन महसूल अधिकारी,धारूर तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी यांच्या संगणमताने वरील देवस्थान इनामी जमीनीची स्वतःच्या व स्वतःच्या भावांच्या व इतर नातेवाईकांच्या नावाने अवैध प्रकारे वहिती करुन घेतली घेतली असून वर नमुद देवस्थान इनामी जमीनीचे अनुदान , विमा व इतर शासकीय योजनांचा लाभ ही ते घेत आहे जी की अवैध असून ते तात्काळ थांबविण्यात यावे. देवस्थान गुलजार मस्जीदच्या इनामी जमीनीचे गांभीर्य पाहता मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी या प्रकरणात स्वता : लक्ष घालून प्रकरण आपल्या न्याय प्रविष्ठात घेवून दोशी महसूल अधिकारी, तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी व इतर यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात यावे