Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडकेज११ कोटी वीज बील थकले धनेगाव पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तोडले

११ कोटी वीज बील थकले धनेगाव पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तोडले

केज (रिपोर्टर)- केज, धारूर, नगर पालिकेसह १२ गावांना धनेगावच्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्याचे वीज बील ११ कोटी थकीत असल्याने वीज बिलासाठी आठ दिवसांपुर्वी वीज कंपनीने कनेक्शन कट केल्याने नागरिकांना आठ दिवसांपासून पाण्याचा पुरवठा बंद झालेला आहे. पाणी असतानाही केवळ बिलाअभावी नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे दिसून येऊ लागले.
केज तालुक्यातील धनेगावच्या धरणातून केज, धारूर नगरपालिकेसह बारा गावच्या नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करणार्‍या वॉटर फिल्टरच्या विजेचे बील वेळेवर भरले जात नाही. तब्बल ११ कोटी वीज बिल थकल्याने आठ दिवसांपुर्वी वीज कंपनीने विजेचे कनेक्शन तोडल्यामुळे धारूर, केज सह बारा गावच्या नागरिकांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. कोविडमुळे वसुली झाली नसल्याचे कारण सांगत विजेचे बील भरले नाही. त्यामुळे एवढे मोठे बील थकले असल्याचे सागंण्यात येत आहे.

१२ गावच्या ग्रा.पं.मुळे थकबाकी वाढली
विजेचे बील थकवण्यामागे जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग दोषी असून ज्या १२ च्या ग्रामपंचायतींना पाण्याचा पुरवठा केला जातो त्या ग्राम पंचायतींकडून पाणी पट्टी वसुली केली जात नाही त्यामुळेच एवढी मोठी थकबाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

केज न.पं.ने
९ लाख भरले

केज, धारूर आणि १२ गाव यांनी मिळून विजेचे बील भरणे गरजेचे आहे मात्र बील भरण्याकडे धारूर न.प. आणि १२ गाव दुर्लक्ष करत आहे. केजची नगर पंचायतने मात्र सातत्याने बील भरत राहते. केज न.पं.ने नुकतेच ९ लाख २८ हजार भरले असल्याचे प्रभारी मुख्याधिकारी हजारे यांनी म्हटले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!