Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडसहकारमंत्र्यांसह सहनिबंधकांच्या न्यायकक्षेकडे जिल्ह्याचे लक्ष

सहकारमंत्र्यांसह सहनिबंधकांच्या न्यायकक्षेकडे जिल्ह्याचे लक्ष


‘त्या’ ८७ पैकी ४८ उमेदवारांनी सहनिबंधक लातूर यांच्याकडे निवडणूक
निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयाला दिले आव्हान ४ मार्चला सुनावणी
तत्कालीन सहकारमंत्र्यांच्या निर्णय प्रकरणात दोन मार्चला विद्यमान सहकारमंत्र्यांच्या न्याय कक्षेत
सुनावणी
बीड (रिपोर्टर)- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आदर्श उपविधीतील नियमानुसार संस्था मतदारसंघताले तब्बल ८७ उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर आता ४८ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात सहनिबंधक लातूर यांच्याकडे अपील केली असून या प्रकरणाची सुनावणी ४ मार्चला होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागून असताना तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपविधीतील पोटनियम ३४ ए (५) मधल्या अटीला अंतरीम स्थगिती दिली होती. त्या प्रकरणाची अंतिम सुनावणी २ तारखेला सहकार मंत्र्यांच्या न्याय कक्षेत होणार असल्याने या सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.
गेल्या पाच वर्षांपुर्वी तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँकेच्या आदर्श उपविधीतील पोट कलम ३४ ए (५) यामधील अटींना अंतरीम स्थगिती दिली होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपुर्वी उपविधीतील नियमानुसार अ आणि ब दर्जा नसलेल्या संस्थांच्या उमेदवारांनाही निवडणूक लढवता आली होती. यावर्षी मात्र जिल्हा बँकेच्या उपविधीतील नियमांवर बोट ठेवून निवडणूक निर्णय अधिकारी विश्‍वास देशमुख यांनी संस्था मतदारसंघातल्या सर्वचे सर्व ८७ उमेदवारांना निवडणूक लढवण्याबाबत अपात्र ठरवले. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्र्रेस, भारतीय जनता पार्टीसह अन्य पक्ष-संघटनेच्या तब्बल ४८ उमेदवारांनी सहकार सहनिबंधक, लातूर यांच्या कोर्टात धाव घेतली. आपआपल्या वकिलांमार्फत या निर्णयाला आव्हान दिले. या प्रकरणाचा निकाल १० दिवसात देणे क्रमप्राप्त असल्याने या प्रकरणाची सुनावणी आणि अंतिम निर्णय ४ मार्च रोजी होणार आहे. या प्रकरणाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असतानाच तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात १ एप्रिल २०१५ रोजी दाखल असलेल्या धनराज राजाभाऊ मुंडे यांच्या प्रकरणातील सुनावणीही येत्या दोन दिवसात २ मार्च रोजी सहकार मंत्र्यांच्या न्याय कक्षेत होणार आहे. या सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!