परळी (रिपोर्टर) परतीच्या पावसाने २० ऑक्टोबरच्या दरम्यान परळी तालुक्यात धुमाकूळ घातला होता. पुराच्या पाण्यात गाढेपिंपळगाव येथील तरुण वाहून गेला होता. त्याचा शोध सुरू होता. तब्बल सात दिवसानंतर आज सकाळी या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.
अक्षय आरगडे (रा. गाढेपिंपळगाव) हा तरुण २० ऑक्टोबर रोजी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता. त्याचा शोध घेतला जात होता. मात्र तो सापडत नव्हता. अखेर आज सातव्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गावाच्या अर्धा कि.मी. अंतरावर मृतदेह आढळून आला. घटनास्थळी तलाठी, मंडल अधिकार्यांसह आदी दाखल झाले होते.