बीड (रिपोर्टर)ः- दारु पिवून गाडी चालवणार्या विरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण बीड येथील न्यायालयात सुरू होते. न्यायालयाने चालकास दोषी ठरवून दहा हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्याची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विनायक सोपानराव घोलप रा.तळेगांव हा मोटारसायकल क्र.एम.एच.23 जी.3282 यावरुन चर्हाटा फाटयावरुन बीडकडे येत होता. त्यात वाहतूक शाखेचे कर्मचारी बाळू लक्ष्मण दुबाले यांनी हटकले होते. सदरील मोटारसायकल स्वार दारु पिलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्याचा विरोधात शिवाजी नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी बालाजी रामचंद्र मुळे, राजेश वाघमारे, यांनी तपास केला होता. हे प्रकरण बीड येथील न्यायालयात सुरू होते. न्यायाधीश अविनाश पाटील यांनी घोलप यास दोषी ठरवून दहा हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्याची कैद भोगण्याचे आदेश दिले आहे.
टिप : बातमीमध्ये वापरलेला फोटो प्रतिकात्मक आहे