दिंद्रुड(रिपोर्टर)ः-एका चाळीस वर्षीय अनोळखी व्यक्तीने बुटाच्या लेसने एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अर्धनग्न मृतदेह आढळून आला. याची माहिती स्थानीकांनी दिंद्रुड पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. ही हत्या की आत्महत्या या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.
दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दतील कारीच्या पिंपरी लवन शिवारामध्ये परराज्यातील एका अनोळखी व्यक्तीने बुटाच्या लेसने फाशी घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह स्थानीकांना दिसला. याची माहिती पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.