बीड (रिपोर्टर) खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. या हंगामात शेतकर्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जाते. यावर्षी बीड जिल्ह्यासाठी 1 हजार 760 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत. जिल्हाभरात 1 लाख 507 शेतकरी आहेत. हे उद्दिष्ट पुर्ण होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक राष्ट्रीयकृत बँकांचा पीक कर्जाबाबात नकारार्थी सूर असतो. विनवण्या, मागण्या केल्यानंतर बँका शेतकर्यांना पीक कर्ज देत असतात.
पीक कर्जाच्या संदर्भात दरवर्षी अनेक तक्रारी असतात, काही वेळा तर पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकर्यांना आंदोलन करण्याची वेळ येते. शेतकर्यांना सावकाराच्या दारात पैशासाठी जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेकडून पीक कर्जाचे वाटप केले जाते. काही राष्ट्रीयकृत बँका जाणीवपुर्वक शेतकर्यांना पीक कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करतात. बीड जिल्ह्यात 1 लाख 507 शेतकरी असून या शेतकर्यांना 1 हजार 760 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत. पीक कर्जाच्या संदर्भात राजकीय पुढार्यांचीही उदासीनता दरवर्षी पहावयास मिळते. जितके उद्दिष्ट दिले आहे त्यात तितके उद्दिष्ट पुर्ण होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.